शहादा- वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन वीज कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात करण्यात आले तर प्रशासनाच्या धिक्कार करुन निषेध नोंदविण्यात आला. औद्योगिक विवाद कायदा 1947 च्या कलम 22/1 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपनीतील कर्मचारी अभियंते व अधिकार्यांच्या प्रलंबित प्रश्नांकरिता 7 जानेवारी रोजी एक दिवसीय संपासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपनीतील कर्मचारी अभियंते व अधिकार्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात व्यवस्थापनाकडे गेल्या दोन वर्षापासून सतत पाठपुरावा केला जात होता त्यामध्ये चर्चेअंती वाटाघाटी सुद्धा झाले परंतु प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भात शहादा वीज कर्मचारी कृती समिती द्वारे नाराजी व्यक्त करण्यात येऊन संघटनेच्या नेत्यांच्या एकमुखी ठरावानंतर 7 रोजी चोवीस तासाच्या लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या मागण्यांसाठी संप
महापारेषण कंपनीतील स्टॉप सेटअप लागू करीत असताना आधीचे एकूण मंजूर पदे कमी न करता अमलात आणावे , महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करूनच अमलात आणावे , शासन व्यवस्थापनाने महावितरण कंपनीने राबवण्यात येत असलेली खाजगीकरण करण्याचे धोरण थांबवावे , महानिर्मिती कंपनीच्या अधिकारी कार्यरत असलेल्या लघू जलविद्युत निर्मिती संघाचे शासनाने अधिग्रहण महानिर्मिती कंपनीच्या अधिकारी कार्यालयात ठेवावे , महानिर्मिती कंपनीच्या 210 बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे सर्व कर्मचार्यांकरिता मान्य केलेली महाराष्ट्र शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धरतीवरील पेन्शन योजना लागू कराव्या कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे , कंपनीतील बदली धोरणाचा पुनर्विचार संघटनेसोबत चर्चा करून राबविण्यात यावे , कंपनीतील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचार्यांना कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे यासह विविध प्रमुख मागण्या करिता संपावर इतके असुन एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.
संप यशस्वितेचा दावा
7 जानेवारी रोजीच्या लाक्षणिक संप 100 टक्के यशस्वी झाला. सुमारे 300 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. यात किशोर गिरासे, यशपाल गिरासे, बी.आर.बोरसे, विजय लांडगे, सुनील पाटील, टी.एन.मन्सुरी, नितीन रणदिवे, धनराज महाले, प्रकाश राठोड, नागेश ठाकरे, दयानंद भामरे, हेमंत मराठे, जी.एच.सोनवणे, दिनेश बागुलसह कृती समितीच्या पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थित आंदोलन करण्यात आले.