शहाद्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट

0

शहादा । ओखी वादाळामुळे निर्माण झालेल्या वातावरण बदलाचे परिणाम दुसर्‍या दिवशीही जाणवू लागले. वातावरणातील बदलामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळात महाविद्यालयात न पाठविणे पसंत केल्याने आज शाळा महाविद्यालयांमध्ये शुकशूकाट होता. दरम्यान, ढगाळ वातावरण व पावसामुळे कापसाचे नुकसान झाल्याची माहिती काही शेतकर्‍यांनी दिली आहे. शिवाय पावसामुळे आठवडे बाजारावर मोठा परिणाम झाल्याचे वृत्त आहे. बुधवारीही दिवसभर ढगाळ वातावर होते.

पिकांचे नुकसान
शेतकर्‍यांचे पावसामुळे कापसाच्या, हरभरा पिकाचे नुकसान झाले . कापनीला आलेला चांगला हरभरा कालचा (ओखी वादळ) पावसामुळे येणार नाही अशी खंत उजळोद ता शहादा येथील शेतकरी संजय साठे यांनी व्यक्त केलीज्या शेतकर्‍यांचा कापुस वेचणीचा राहिला होता तो जमीनीवर पडल्याने खराब झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. अचानक आलेल्या पावसामुळे काही शेतकर्‍यांची तारांबळ उडाली होती. ढगाळ वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भिती व्यक्त केली
जात आहे.

एसटी बसेस उशीरा धावल्या
तालुक्यात 5 डिसेंबर रोजी दिवसभर झालेल्या पावसामुळे व वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे 6 डिसेंबर रोजी विविध शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा हजेरीवर परिणाम झाला आज ही ढगाळ वातावरण गारव्यामुळे वर्दळ कमी होती. ओखी वादळाचा तडाखा संपूर्ण शहरात जाणवू लागला आहे. शहादा शहरात ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी येतात वातावरणातील बदल बघता बहुसंख्य पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविता घरीच ठेवणे पसंत केले त्यामुळे शाळा महाविद्यालयात संख्या कमी होती ग्रामीण भागात बसेस उशीरा पोहचल्याने काही विद्यार्थी उशीराने आले.

स्वेटर विक्रेत्यांची धावपळ
दोंडाईचा रस्त्यावरील स्वेटर विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली साधारण 15 ते 16 दुकानी थाटल्या आहेत त्यातील उबदार कपडे जसे स्वेटर मफलर शाली ओल्या होवु नये म्हणून दुकान ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. 5 डिसेंबर रोजी दिवसभर पावसाची रिप रिप सुरु असल्याने मंगळवार हया आठवडे बाजारावर मोठा परिणाम दिसून आला भाजीमार्केट मध्ये वर्दळ कमी होती भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला पडून होता.