शहादा:शहरातील अब्दुल हमीद चौकात आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या पोलीस व आरोग्य विभागाचे पथकाला कुठलीही माहिती न देता मोठा जमाव गोळा करत त्यांना दमबाजी व अरेरावी करुन शासकीय कामात अडथळा आणला. तसेच लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी शहादा पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.
येथील अब्दुल हमीद चौकात आरोग्य विभागाचे पथक पोलिसांच्या पथकासह नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी 28 एप्रिल रोजी गेले होते. त्यावेळी काही युवकांनी आरोग्य विभागाचे पथकास तसेच पोलिसांशी वाद घालुन माहिती न देता अरेरावी करुन व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच कुठलीही खबरदारी न घेता तसेच तोंडास मास्क अथवा रुमाल न लावता लोकांचे आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य करणार्या बिलकिस अन्सारी, दिलरेश उर्फ डिक्को अन्सारी, सिराज युसूफ खाटीक, जुबेर अहेमद बेग मिर्झा, दिला मजहर बेग मिर्झा, गुड्डा हाशिम बेग (सर्व रा.अब्दुल हमीद चौक, शहादा) यांच्या विरुध्द पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक योगिता पाटील करीत आहेत.