शहाद्यात शिक्षकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

शहादा : कोविड -१९ या विषाणूचा फैलावाने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शहादा येथील पंचशील काॅलणीतील शिक्षक मित्रांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करुन परिसरातील गरीब कुटुंबियांना त्याचे वाटप करण्यात आले .


कोरोना या विषाणूचा संकटामुळे सर्वत्र सर्वत्र लॉक डाऊन असल्याने अनेक लोक घरात बंदिस्त आहे. मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शहादा येथील पंचशील काॅलणी शिक्षक मित्रांनी सामाजिक भान जोपासत पंचशिल परिसरातील गरीब कुटुंबांसाठी जीवनाश्यक वस्तुंचे किट तयार करुन घरोघरी जाऊन त्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी इब्टा शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दादाभाई पिंपळे. केंद्र प्रमुख नरेंद्र महिरे, उपमुख्याध्यापक नरेंद्र कुवर , मुख्याध्यापक संतोष कुवर, उपशिक्षक शांतीलाल अहिरे, ग्रामसेवक राजेंद्र आगळे , ग्रामसेवक प्रवीण खाडे, प्रा चंद्रविलास बि-हाडे आदींनी सामूहिक रित्या वाटप केले