शहाद्यात साळी वाईनशॉपसह स्वागत बारवर करण्यात आली कारवाई

0

शहादा । शहाद्यातील खेतीया रोड मार्गावरील साळी वाईनशॉप व स्वागत बार ही दोघे दुकाने सील करण्यात आली आहे. प्रशांत निकुंभ यांनी तीन महिन्यापूर्वी याचिका दाखल करून यासंदर्भात 500 मीटरच्या आत असणार्‍या वॉईन शॉप व बार संदर्भात माहिती कळविली होती. 20 दिवसापूर्वी या बाबीचा खुलासा करत तपासयंत्रणा कामाला लागली होती. सदरच्या वॉईन शॉप व बारवर कारवाई झाल्यानंतर शहरातील इतर दुकानांना देखील सील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेली काही महिने हे वॉईन शॉप व बार बिनधास्तपणे शासकीय नियम डावलून सुरू होते. आज यावर कारवाई झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला आहे. प्रशांत निकुंभ यांनी केलेल्या या याचिकेमुळे इतर वॉईन शॉप व बार लवकरच सील व्हावेत, अशी नागरिकांची चर्चा सुरू होती. ही कारवाई निरीक्षक डी.एम.गवळी, दुय्यम निरीक्षक डी.डी.बागळे, सहाय्यक निरीक्षक सुनिल पवार, मोहन पवार, भूषण चौधरी यांनी केली.