शहाद्यात हागणदारी मुक्त अभियान समितीची पाहणी

0

शहादा। नगरपरिषद अंतर्गत हागणदारी मुक्त अभियान तपासणी करीता राज्यस्तरीय समिती सदस्यांनी शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी व भेटी दिल्या. मिरा भाईंदर महानगर पालिका उपायुक्त दिपक पुजारी यांच्या नेतृत्वाखाली समितीने तपासणी केली. शहरातील सुमारे तीन तास फेरफटका मारला. हागणदारी मुक्त पालिका बाबत प्रशंसा केली. महाराष्ट्र राज्य नगरविकास विभाग अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभिमान ( नागरी ) राज्य स्तरीय तपासणी समिती हगणदारी मुक्त नगरपालिकेस भेटी सुरू आहेत. शहादा नगर पालिकेने शहरातील विविध भागात शासनाच्या योजनाच्या निधीतून शैचालय बांधकाम केले आहे. शहादा शहर हागणदारी मुक्त होण्यासाठी पालिका नगरअध्यक्ष मोतीलाल पाटील याच्या नेतृत्वाखाली 90 टक्के पेक्षा जास्त काम झालेली आहे.

कामाचे समाधान व केले कौतुक
राज्यस्तरीय स्पर्धेत हागणदारी मुक्त नगरपालिका तपासणीसाठी मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त दिपक पुजारी. धुळे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त ञ्यबंक कांबळे. निर्मल ग्रामीण निर्माण केंद्र नाशिक नलिनी नावरेकर. पञकार दत्ताञय बागुल आदी समिती सदस्यांनी आज भेट दिली. पहाटे पाच वाजेपर्यंत पासून समिती सोबत नगरअध्यक्ष मोतीलाल पाटील. उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, मुख्याधिकारी डॉ. सुधिर गवळी आदि उपस्थित होते. राज्यस्तरीय समितीने पहाटे मीरानगर, पाडळदा रस्ता श्रमिक नगर, सालदार नगर, विज वितरण कार्यालय, कॅनल भाग, गोमाई नदी पाञ, अमरधाम , भावसार भढ्ढी, रामगड, वसंतराव नाईक महाविद्यालय शेजारील परिसर, गरीब नवाज कॉलनी या भागांना समिती सदस्यांनी भेटी दिल्या. शहादा नगरपालिकेने शहर हगणदारी मुक्त अभियानाचे उत्कृष्ट नियोजन करीत योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला आहे. यामुळे शहर हगणदारी मुक्त कडे वाटचाल करत आहे. खेतिया चार रस्ता, न्यु इंग्लिश शाळेलगतच्या सर्वाजनिक शौचालय स्वच्छतेचे एक भाग असुन समितीच्या पाहणी दौर्‍यात पहाटे रस्त्यावर उघड्यावर शौचालय करणारे नागरीक आढळून न आल्याने समिती प्रमुख उपायुक्त दिपक पुजारी यांनी कामाचे समाधान व कौतुक केले. यावेळी पालिकेतील अनिल सोनार व विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.