शहाद्यात 1 रोजी संविधान सन्मान रॅली

0

शहादा- संविधानाचा सन्मान ही खरी देशभक्ती असून नववर्षाचा संकल्प संविधान सन्मानाने करण्यासाठी 1जानेवारी रोजी शहादा येथे होणार्‍या संविधान सन्मान रॅलीत सर्व मतभेद विसरून सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2019 रोजी आयोजित सन्मान रॅली व सभा आयोजनासाठी रविवारी नगरपालिका शाळा क्रमांक 7 मध्ये बैठक झाली. यावेळी संविधान सन्मान रॅलीचा प्रचार व जागृती अभियानात योगदान देणार्‍या संघटनांचा अभिनंदनाचा ठराव विष्णू जोंधळे यांनी मांडला. यावेळी दादाभाई पिंपळे म्हणाले की, 1 जानेवारी 2019 रोजी संविधानाचा सन्मान असून आपण सर्व जातीधर्माचे लोक मिळून हा कार्यक्रम आयोजित करीत आहोत. हे शहाद्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद केली जाईल. तसेच वनिताताई पटले यांनी आपले मत प्रदर्शित करतांना महिलांचा सहभाग जास्तीत जास्त नोंदविला जाईल व अभूतपूर्व कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिवाजी महाले यांनी शहादा शहरातून निघणार्‍या रँलीच्या या नियोजनात स्वयंसेवकाची जबाबदारी घेतली असून सर्व स्वयंसेवक हे संत रविदास नोकरदार मैत्री संघाकडून या काम करतील. मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे मा.ज्ञानेश्वर इंदासराव यांनी घोषणा ह्या कुणाच्या ही भावना दुखावणार नाहीत याचे खबरदारी घेण्याचे आवाहन केले.योगेश रंगदास (फौजी) यांनी वक्त्यांची भाषणे शक्यतोवर मुद्रित स्वरूपात संयोजन समितीकडे आधीच घेण्याची सुचना मांडली. अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे महेंद्र बैसाणे यांनी प्रक्षोभक व संघर्ष निर्माण करणार्‍या मुद्यांवर बोलू नये याबाबत लक्ष वेधले. बुद्धिस्ट ग्रामसेवक संघटना ,सातपुडा परिसर पावरा समाज उन्नती मंडळ, संत गुरू रविदास नोकरदार मैत्री संघ,सम्राट युवा मंच लोणखेडा आदी संघटनांनी आपले आर्थिक योगदान घोषित केले.

सकाळी 11 वाजता रॅलीला प्रारंभ
रॅलीच्या नियोजनानुसार सकाळी 11-00 वाजता राष्ट्रपिता महात्मा फुले क्रांतीज्योती स्मारकापासून अभिवादन सोहळ्याने प्रारंभ होईल. घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांना अभिवादन करत म्युनसिपल हायस्कूल मार्गाने क्रुषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सभेत रुपांतर होईल. यावेळी स्वागत अध्यक्ष म्हणून दिपकबापू पाटील, अध्यक्ष म्हणून मोतीलाल तात्या पाटील, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.संजय जाधव, प्रा.एल.एस.सैय्यद, आण्णासाहेब अरविंद कुवर,नानासाहेब बापूजी जगदेव, वनिता पटले, जि.प.सभापती तात्यासाहेब बागले,शिवाजी मोरे साहेब, जेलसिंग पावरा साहेब, नामदेव पटले साहेब आदींसह विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यात सातपुडा परिसर आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळ,गुरु रविदास उन्नती मंडळ, सम्राट युवा मंच,समता परिषद, अंधश्रद्धा निर्मुलन समिती,जातीअंत संघर्ष समिती शहादा, सिद्धार्थ नवयुवक मंडळ मंदाणा, भिमशक्ती युवा संस्था भोंगरा,शहादा तालुका मराठी पत्रकार संघ,शहादा तालुका पत्रकार संघ,नागसेन नगर युवा मंच,बी बाँईज ग्रुप, जयभिम नवयुवक मंडळ आंबेडकर चौक,सिद्धार्थ युवा मंच कुकडेल,राजमाता रमाई महिला मंच शहादा, जुनी पेंशन हक्क संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी शिक्षक संघटना, अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा)आदींचा समावेश आहे. या बैठकीला शशीकांत कुवर, संतोष कुवर,अझहर पठाण, बलवंत देवरे,पितांबर पेंढारकर, रघुनाथ बळसाणे,प्रविण शिंदे, प्रताप मोते,योगेश रंगदास, संदीप रायते,अरुण महिरे,दशरथ घोडसे,मिलिंद माणिक, दिपक खैरनार, भैय्या साळवे, प्रदीप रंगारे,प्रकाश पवार, दिलीप पवार, नरेंद्र कुवर,राजेंद्र रंगदास आदी मान्यवर उपस्थित होते.