शहाद्यात 23 पासून विद्रोही साहित्य संमेलन

0

शहादा । 13 वे विद्रोही साहित्य आणि सांस्कृतिक संमेलनाचे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 23 व 24 डिसेंबर रोजी येथील अंबरसिंग महाराज साहित्य नगरी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसात विविध विषयांवरील परिसंवाद होणार आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन 
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक कॉ. नजुबाई गावित या असतील. उद्घाटन ज्येष्ठ नाटककार आतमजितसंग पंजाब यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष वाहरू सोनवणे हे राहतील. संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजात मिरवणुकीने प्रारंभ होईल.11 वाजता उद्घाटन होणार असून दुपारी अडीच ते चार वाजेपर्यंत शहादा, तापी, सातपुडा परिसरातील चळवळींचा इतिहासावरील ठसा या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी साडेचार ते साडेपाच यावेळात आदिवासी संस्कृतितील लोकशाही मुल्य व्यवस्था आणि फॅसिमविरेधी लढा या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 24 डिसेंबर रेाजी सकाळी 9-11 गटचर्चा व मांडणी, अडीच ते 4 वाजेपर्यंत जात वर्ग स्त्री दास्य अंता शिवाय लोकशाही मुल्य व्यवस्था बळकट होणाार नाही या विषयावर परिसंवाद होणार असून 4-6 या वेळी ठराव वाच व सत्कार कार्यक्रम होणार आहे.