शहादा । शहादा येथे 23, 24 डिसेंबरल रोजी 13 वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जिल्हावासीयांना वैचारिक मेजवणीची नामी संधी मिळणार आहे. 13 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक कॉ.नजुबाई गावित यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात आवड असणार्या साहित्यिकांनी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अहवान स्वागताध्यक्ष विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे अध्यक्ष वाहरू सोनावणे यांनी केले आहे.
ग्रंडदिडीने होणार सुरूवात
या साहित्य संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, कला सांस्कृतिक सादरीकरण, गटचर्चा व मांडणी,जाहीर मुलाखत आदींचा समावेश असणार आहे. 23 तारखेस सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत ग्रंथ दिंडी व मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजेला संमेलनाचे उद्घाटन होईल.संमेलनाचे उद्घाटन पंजाब मधील जेष्ठ नाटककार आतमजितसिंग यांच्या हस्ते होणार आहे. स्वागत समारंभाला मुडनाकूडू चिन्नास्वामी,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.भारत पाटणकर,साथी काळूराम धोदडेे,साहित्यिक दीनानाथ मनोहर, प्रा.रणजीत परदेशी ,लेखक व साहित्यिक पदमश्री डॉ.गणेश देवी ,कॉ.डोंगरे बागुल,विचारवंत डॉ.बाबुराव गुरव ,राजकुमार तांगडे ,कॉ. सुहास परांजपे , डॉ.छाया दातार ,डॉ.भालचंद्र कांगो ,राजा शिरगुप्पे, डॉ. सुरेखा देवी , कॉ.कुमार शिराळकर ,गौतम कांबळे,संजोयन समिती अध्यक्ष आयु.अरविंद कुवर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.