शहाद्यात 28 पथकांची तपासणी पूर्ण

0

सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे
शहादा :शहरात 30 पैकी 28 पथकांनी तपासणी पूर्ण केली आहे. अब्दुल हमीद चौकात अडचण आली असुन प्रशासनाने सकारात्मक बाजू मांडल्याने तपासणी करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
शहादा शहरातील नगरपालीका हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 मधील 2 व 04 मधील 2 रुग्ण अशा 4 रुग्णास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे. शहरातील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्र.7,8,9,1,2,3,4 मधील परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केला आहे. नागरिकांच्या सोयीकरीता प्रशासनामार्फ़त काही निर्णय घेण्यात येत आहे. त्यात प्रतिबंधात्मक क्षेत्रातील किराणा दुकाने, घरपोच सेवा देण्याच्या अटीवर सुरु करण्यात यावी. प्रतिबंधात्मक क्षेत्राव्यतिरिक्त भागात फ़िरते भाजीपाला विक्रेत्यांना न.पा.कडून परवानगी देण्यात येत आहे. त्यांनी आवश्यक ते ओळखपत्र व व्यवसाय करावयासाठी नेमुन दिलेल्या परिसराची माहिती न.पा.च्या कार्यालयातून घ्यावी. प्रतिबंधात्मक क्षेत्र तसेच इतर क्षेत्रातील किराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वा. (वेळेत बदल) पर्यंत सुरु ठेवावी. किराणा दुकान मालकांनी घरपोच सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. नागरिकांनी मास्क लावणे आवश्यक आहे. तसेच सॅनिटाईझरचा वापर करणे व सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे.