शहादा । पालिकेचा कार्यभार संभाळायला एक वर्ष पूर्ण झाले असून 13 प्रभागत 7 कोटी 64 लाखांची विकास कामे सुरू केली आहे. विरोधक अभ्यासू मिळाल्याने कामे करतांना अडचणी येत नाही. विरोधकांचे सहकार्य असल्याने विकास कामांना गती मिळाल्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नगराध्यक्ष पदभार सांभाळायला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पाटील यांनी दालनात पत्राकार परिषदेचे आयेाजन केले होते. येत्या चार वर्षाच्या कार्यकाळात शहरात गटारी आणि रस्ते कामांचे विकास आराखडा तयार करण्यात येवून मंजूरीसाठी पाठविण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विविध कामांची दिली माहिती
पाटचारीवर अतिक्रमण धारक व्यावसायिकांचे पूनर्वसन करता येणार आहे. पंतप्रधान घरकुल योजनेसाठी दोन कोटी मंजूर झाले असून 394 घरे यावर्षी बांधण्यात येणार आहे. 22 कोटींचा निधी शासनाकडून याकामी येणार आहे. सध्या 70 लिटर पर माणसाला पाणी पुरवठा होत असून भविष्यात 140 लिटर पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहाराचा विस्तार वाढला आहे. कुकडेल शिवार व शहादा शहर असा भाग आहे. त्यासाठी हद्द वाढीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. येत्या सहा महिन्यात हा प्रस्ताव मंजूर झाला तर सर्वात मोठे काम होणारआहे. सध्याचे बसस्थानकाचे पूनर्वसन करून ते बीओटी तत्त्वावर काम करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्र्यांना देणार आहोत. व नवीन बसस्थानक जागेवर डेपो न्यावा यासाठीही प्रस्ताव देण्यात येइल. शाळांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एनयूएचएम अंतर्गत शहरातील गरीब नवाज कॉलणीत आरोग्य केंद्र उभारू, शहरातील ओपण प्लेस विकसीत केल्या जातील. कर्मचारी कमरतेवरही त्रांनी लक्ष वेधले यावेळी मुख्याधिकारी राहुल वाघ, अधिक्षक श्री. सावरे, जि. प. सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक संजय साठे, रियाज कुरेशी, रवींद्र जमादार, प्रशांत निकम, संतोष वाल्हे, लक्ष्मण बढे, एकनाथ नाईक, भुरा पवार आदी उपस्थित होते.