शहादा: शहरातील कंटेनमेंट झोन परिसरातील सर्व कुटुंबांची शुक्रवारी वैद्यकिय तपासणी करण्यात आली. सर्व पथकांचे समन्वय आणि नियंत्रण वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पटेल यांच्यामार्फत तपासणी करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी चेतनसिंग गिरासे यांनी दिली.
नंदुरबार येथे दिलेले डुरल रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाही. कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागात रहिवाशांनी रस्ते बंद केल्याचे निदर्शनास आल्याने रस्ते मोकळी करण्यासंदर्भात मुख्याधिकारी नगरपरिषद शहादा यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य भाजी मंडई, कंटेनमेंट जोड परिसरात असल्याने स्थलांतरित करण्याची बाब विचाराधीन आहे. याशिवाय कोणत्याही नागरिकास ताप, खोकला व अन्य लक्षण असल्यास त्वरित संपर्क साधणेबाबत आवाहन केले आहे. मुख्य किराणा व्यापार्यांना होम डिलिव्हरी देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. तसेच गॅस वितरीत करणार्या वाहनांना आणि शेती उपयोगी वाहनांना आवश्यक डिझेल देण्यासंदर्भात ग्रामीण भागातील पेट्रोल पंप यांना सूचना दिल्या आहे. सद्यस्थितीत तीन रुग्ण नंदुरबार येथे दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय काही ग्रामीण भागात स्थलांतरित ऊसतोड मजूर येत असल्याने त्यांचीही वैद्यकीय तपासणी करून होम क्वारंटाईन करण्याबाबत सूचना क्षेत्रीय अधिकारी व संबंधित वैद्यकीय अधिकार्यांना देण्यात आल्या आहे.