किन्हवली । शहापूर तालुक्यातील मळेगाव येथील समाजसेवक राजेशकुमार शिर्के यांनी आरपीएस प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था स्थापन केली असून, या संस्थेच्या मुद्रा अनावरण समारंभ नुकताच मळेगाव येथे संपन्न झाला. शहापूर तालुक्यातील मळेगावचे रहिवासी राजेशकुमार शिर्के यांनी आरपीएस प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून एका समारंभात या संस्थेची मुद्रा व रवींद्र यशवंतराव -देशमुख यांनी रचनाबद्ध केलेल्या आरपीएसची ललकारी या गीतांच्या सिडीचे अनावरण टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण शहापूर तालुक्यात या संस्थेच्या 555 शाखांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असून आतापर्यंत 125 शाखा उघडल्या आहेत, असे संस्थापक अध्यक्ष राजेशकुमार शिर्के यांनी प्रास्ताविकात सांगितले.
स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार
या दिवशी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. शाखांच्या नियुक्त पदाधिकार्याना नियुक्तीपत्रा सोबत झाडांची रोपे भेट देण्यात आली. तरुणांच्या आरोग्य रक्षणासाठी किन्हवली, डोळखांब, शेणवा या परिसरात मोफत रुग्णवाहिका सेवा, व्यायामशाळा उभारण्याचा मानस असून वन विभाग, पोलीस भरती व विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिरे आयोजीत करण्यात येणार आहेत. याप्रसंगी व्यासपीठावर टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथजी महाराज, वनपरिक्षेत्र धिकारी संजय कोकरे, संस्थापक अध्यक्ष राजेशकुमार शिर्के, सचिव सुरेश पाटील, मळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच दिक्षा पडवळ, उपसरपंच अमृता वरकुटे सदस्य वैभव पडवळ, वैशाली शिर्के, माजी सरपंच काळूराम उघडा, पोलीस पाटील किरण जाधव, रविद्र यशवंतराव,भगवान कुडव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रासंचालन मनोहर मडके व कल्पेश शिर्के यांनी केल.