शहापूर । सालाबादप्रमाणे यंदाही माहुली निसर्ग सेवा न्यास ह्या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांचे निसर्ग शिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर 24 ते 25 डिसेंबर 17 पर्यंत शहापूर तालुक्यातील माऊली परिसर व अभयारण्य माऊली निसर्ग सेवा न्यास येथे होणार आहे. माऊली निसर्ग सेवा न्यास ह्या संस्थेची 1989 मध्ये निसर्ग प्रेमिनीं एकत्र येऊन स्थापना केली.जनमानसात निसर्ग प्रेम वाढावे व त्यातून निसर्गाचे सौरक्षण व्हावे हा उदेश समोर ठेऊन मंडळाने आजपर्यंत निसर्ग विषयक स्लाइड शो, पक्षी निरीक्षण, पर्यावरण मेळा, जागर किल्ले माऊलीचा, माउली परिक्रमा, निसर्ग भ्रमणाचे विविध कार्यक्रम केले आहेत.
नोंदणीसाठी संपर्काचे आवाहन
या शिबिरात विद्यार्थींना निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण, वनस्पती व कीटकाबद्दल माहिती, निसर्गाच्या बाबतीत व्याख्याने व आकाश दर्शन आदीची माहिती ह्या शिबिरात दिली जाणार आहे असे माऊली निसर्ग सेवा न्यास यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रात या म्हटले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी मनिष व्यापारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे व आपल्या परिसरातील पर्यावरणाची माहिती मिळावी यासाठी सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता 2 दिवसांचे निसर्ग शिक्षण शिबीर आयोजित केले आहे. 24 डिसेंबर व 25 डिसेंबर ह्या 2 दिवस हे निसर्ग शिक्षण शिबीर हे शहापूर तालुक्यातील माऊली परिसर व अभयारण्य माऊली निसर्ग सेवा न्यास हे घेणार आहेत.