शहापूर । शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत पाच उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 13 डिसेंबर मतदान होणार्या जिल्हा परिषदेच्या 14 जागा व पंचायत समितीच्या 28 जागांसाठी 23 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन अर्ज भरण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, 23 ते 25 नोहेबरपर्यंत पाच उमेदवारांनी उमेदवार अर्ज निवडणूक अधिकारी शहापूर यांच्याकडे दाखल केले आहेत.
मंगळवारी होणार चित्र स्पष्ट
यामध्ये आसनगाव, वासिंद पश्चिम जिल्हा परिषद गटात प्रत्येकी एक-एक असे 2 अर्ज तर आसनगाव, वासिंद पूर्व, व मोखावणे पंचायत समिती गणासाठी प्रत्येकी एक-एक असे तीन असे एकूण 5 नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याचे सांगितले. तर रविवारी सुट्टी असल्याने आता उमेदवाराना नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवशी किती अर्ज दाखल होणार हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे आज स्पष्ट होईल.