पत्रकारासह पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
जामनेर। तालुक्यातील शहापूर येथे अवैध दारुची भट्टी उध्वस्त करण्यात आली आहे . सध्या देशात कोरोना विषाणुच्या पाश्र्वभुमीवर तालुक्यात शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु असुन पोलीस प्रशासन मेहनत घेत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरासह खेडयापर्यंत तालुकावासीय काटेकोरपणे आदेशाचे पालन करीत आहे. त्याच अनुषंगाने पत्रकाराची टिम ही तालुकाभरात वृत्त संकलन करीत असतांना शहापुर येथे अवैध दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. धरणाच्या साठवण भागात शेताच्या बंधारावर ही भट्टी निदर्शनास आली. पत्रकार सुनील इंगळे यांनी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना याबाबत माहिती दिली. शहापुर येथील पोलीस पाटील यांना सुद्धा कळविण्यात आले . पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवुन दारुची भट्टी उध्वस्त केली. यावेळी पोलीस कर्मचारी राहुल पाटील, निलेश घुगे, तुषार पाटील, विठ्ठल काकडे, विलास चव्हाण, हे.काँ. सोनवणे, पत्रकार गजानन तायडे, अनिल शिरसाठ, अविनाश सपकाळे, सुनिल सुरवाडे, पोलीस पाटील आनंदा सुशीर आदी उपस्थित होते .