शहापूर । ऑगस्ट 2014 ला ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर जानेवारी 2015 ला झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुरेशा संख्येने सदस्य निवडून न आल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्या गठीत होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर अधिनियमात सुधारणा झाल्यावर गट आणि गणांच्या रचनेनंतर शहापुर तालुक्यातील 14 जिल्हा परिषद गटाची सोडत ठाणे येथे तर पंचायत समितीच्या 28 गणाच्या आरक्षणाची सोडत शहापुरात चिठ्ठ्यांच्या साहय्याने शाळकरी मुलांच्या हस्ते काढण्यात आली. या सोडतीत जिल्हा परिषदेच्या शहापुर तालुक्यातील 14 गटांमध्ये काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा वासिंद तर अनुसूचित जमातीसाठी सहा जागांमध्ये मोखावणे, साकडबाव, आवाळे, डोळखांब, शिरोळ, बिरवाडी यांचा समावेश आहे.
14 जागा आरक्षित
शहापूर पंचायत समितीच्या 28 गणांपैकी अनुसूचित जमातीसाठी 14 जागा आरक्षित आहेत. त्यामध्ये मोखावणे,टेंभा, शिरोळ, अघई, डोळखांब, गुंडे व मांजरे महिलांसाठी साकडबाव, वेहळोली बु., आवाळे, कसारा खु., कळमगाव, आसनगाव आणि खर्डी अश्या आहेत. तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी दोन जागा असून वासिंद पश्चिम व महिलांसाठी वासिंद पूर्व राखीव झाल्या आहेत. तर नागरिकांचा मागासवर्गासाठी दोन जागा किन्हवली, मळेगाव अशा आहेत. तर खुला गटामध्ये पाच गटाच्या जागामध्ये गोठेघर, नडगाव, आसनगाव, चेरपोली, सोगाव अशा असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अधिकार्यांची उपस्थिती
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 3 जागामध्ये मळेगाव, गोठेघर व नडगाव तर सर्वसाधारण महिलांसाठी 4 जागामध्ये किन्हवली, चेरपोली, बिरवाडी व मानेखिंड असे आरक्षण पडले आहे. सर्वसाधारणमध्ये 5 जागा अस्नोली, कळंभे, दहिवली, सोगाव व धसई आदी गावांचे आरक्षण काढण्यात आली. शहापूर येथे सोडत काढतेवेळी उपविभागीय अधिकारी संतोष थिटे, तहसीलदार रवींद्र बाविस्कर, पोलीस निरीक्षक महेश शेट्ये, नायब तहसीलदार रमाकांत नाचण, गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.