शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला

0

शहापूर । शहापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर अश्‍विनी अधिकारी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी केली.यामुळे शहापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढून शिवसैनिकांनी जल्लोष केला. सर्वाना संधी मिळावी या उद्देशानुसार तत्कालीन नगराध्यक्षा योगिता धानके यांनी राजीनामा दिला होता. निवडणूक प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी अधिकारी यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कार्यकर्त्यांनी घेतली मेहनत
यावेळी शहापूर नगरपंचायतीच्या कार्यालयात शिवसेनेचे ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, जुने जाणते शिवसैनिक चंद्रकांत वाईरकर (चंदू मास्तर), उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, रश्मी निमसे, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, विधानसभा संपर्क संघटक अरुण पानसरे, आकाश सावंत, माजी नगराध्यक्षा योगिता धानके, उपनगराध्यक्ष आनंद अधिकारी, काशिनाथ तिवरे, सुरेंद्र तेलवणे, बाळा धानके, भाऊ दरोडा, यासह शहापूर नगरसेवक विजय भगत, मिलिंद भोईर, श्रध्दा थोरात, सागर सावंत, अजित आळशी, सुभाष विशे, यांसह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला.