शहापूर । तालुक्यातील शहापूर-वेडवहाळ-टहारपूर ह्या मार्गाची मानव विकास बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी आमदार पाडुरंग बरोरा व शहापूर तालुका युवक आणि विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसने बस आगार प्रमुखांकडे केली आहे. बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे हाल होत आहेत. टहारपूर येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात जाण्यासाठी अघई भागातील वेडवहाळ व पलीचापाडा येथील 64 विद्यार्थ्यांना बस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.
आगारप्रमुखांशी चर्चा
प्रसंगी विद्यार्थ्यांचा इतर वाहनाची सुविधा नसल्याने पायी जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे शहापूर-वेडवहाळ-पलीचापाडा ते टहारपूर हायस्कूल बससेवा तातडीने सुरू करावी. अशी मागणी शहापूर तालुका युवक राष्ट्रवादीचे कमलेश अधिकारी आणि विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धीरज झुगरे यांनी शहापूर बस आगाराचे आगार प्रमुखांशी चर्चा करून निवेदन दिले.