शहाराचा पाणीपुरवठा विस्कळीत

0

पिंपरी : रावेत बंधार्‍यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत झाला. मावळातील पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. रावेत येथील बंधा-यातून महापालिका पाण्याचा उपासा करते. पाणी शुद्ध करुन शहरवासियांनी पाणी पुरवठा केला जातो. पातळी कमी झाल्याने अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागले. यामुळे उपसा कमी झाला.