जळगाव : ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दु राष्ट्र’ या आणि अन्य घोषणांनी जळगाव नगरी गुरूवारी दुमदुमून गेली होती. याप्रसंगी भगव्या ध्वजांमुळे भगवी झालेली जळगाव नगरी, तसेच 25 डिसेंबरला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त काढलेल्या ऐतिहासिक भव्य वाहनफेरी काढण्यात आली होती. या वाहनफेरीमध्ये 700 हून अधिक दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने आणि 1500 हून अधिक जणांनी सहभागी होऊन हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.