नवी दिल्ली । रामदेव बाबा आता शहीद झालेल्या जवानांच्या मुलांसाठी शाळा सरू करणार आहे. ही शाळा याचवर्षी सुरू होणार असून सीमेपलीकडच्या शत्रूंशी किंवा नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या मुलांसाठी ही शाळा असणार आहे. ही शाळेत या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल तसेच ही शाळा निवासी राहणार आहे. ही शाळा दिल्ली-एनसीआर परिसरात असणार असं रामदेव बाबा यांनी जाहीर केले आहे.
शाळेच्या माध्यमातून मुलांची जबाबदारी
पतंजलीची वार्षिक उलाढाल 10 हजार कोटींच्या पुढे गेली आहे. त्यातून कंपनीला मिळणारा नफा विविध समाजोपयोगी कामांसाठी वापरला जातो, अशी माहिती हरिद्वारमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांनी दिली. त्याचवेळी रामदेव बाबांनी शाळेबाबत माहिती दिली. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांच्या कुटुंबीयांना ‘पतंजली’कडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती रामदेव बाबा यांनी दिली तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने पतंजली निवासी शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यापूर्वीही बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या माध्यमातून शहीद जवानांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवले होते.