नवी दिल्ली-शौर्य चक्र विजेता शहीद जवान औरंगजेबविषयीची माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशयावरून भारतीय सैन्याने राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अजूनही चौकशी सुरु आहे.
जम्मू- काश्मीरमध्ये जूनमध्ये औरंगजेबची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या हत्येनंतर देशभरात संतापाची लाटही उसळली होती. औरंगजेबला मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते. औरंगजेबच्या हत्येप्रकरणी अबिद वानी, तजमूल अहमद आणि अदिल वानी अशी तिघांना भारतीय सैन्याच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. या तिघांनी औरंगजेबविषयीचा तपशील उघड केल्याचा संशय आहे.
ताब्यात घेतलेल्या अहमदला भारतीय सैन्याच्या चौकशी पथकाने बेदम मारहाण केल्याचा आरोप अहमदच्या कुटुंबीयांनी केला आहे. दोन दिवसापूर्वी शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भाजपात प्रवेश केला.