51 हजार रुपयांचा निधीचा धनादेश सुपूर्त
पिंपरी चिंचवड : जम्मू-काश्मीर येथे भ्याड दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी चिखलीतील सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटनेने सद्भावना पदयात्रा काढून मदतनिधी जमा केला. जमा झालेला 51 हजार रुपयांचा निधीचा धनादेश आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत माजी सैनिक संघटनेचे भोसरीचे अध्यक्ष नवनाथ मुर्हे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. शहीद जवान संजय राजपूत, नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात येणार आहे.
24 फेब्रुवारीपासून उपक्रमाला सुरुवात…
चिखलीतील सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने या उपक्रमाला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. चिखली म्हेत्रेवस्ती येथील महादेव मंदिर परिसरातील विरंगुळा केंद्रापासून यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्या हस्ते दानपेटी व रथाचे पूजन झाले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष लालासाहेब मोरे, हरीचंद्र जाधव, सुरेश काठोळे, ओंकार राजगुरे, प्रभाकर धनोकार, गजानन ढमाले, सदस्य रमेश काठोळे, रामदास मोरे, प्रल्हाद पाटील, नारायण माने, अनंतराव गुंजाळ, अलका मोरे, मीना मोरे, रुख्मिणी गोसावी, ज्ञानेश्वर साळुंके, संभाजी यादव, जगदीश प्रसाद, विलासराव मराठे, विदर्भ एकता मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते दादासाहेब ठाकरे उपस्थित होते. हाऊसिंग सोसायटीमधील महिला, पुरुष व बालके दुकानदार, व्यापारी, पादचारी यांनी दानपेटीत व मदतनिधी टाकण्यासाठी उत्स्फुर्त सहकार्य केले.
—-