शहीद जवान माने कुटुंबीयांना मदत

0

कोल्हापूर – देशासाठी शहीद झालेले जवान श्रावण माने यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांत्वन केले. शाहूवाडी तालुक्यातील गोगवे हे शहीद जवान श्रावण माने यांचे गाव असून, ना. पाटील यांनी तेथे भेट देत माने कुटुंबीयांच्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असल्याची ग्वाही देतानाच राज्य सरकारच्या वतीने शहीद जवान श्रावण माने यांच्या कुटुंबीयांना 8 लाखांची मदत प्राधान्याने दिली जाईल, याबरोबरच केंद्र सरकारचीही 10 लाखांची मदत मिळेल, अशी ग्वाही दिली.