शहीद दिनाचे परिपत्रक; अधिकारी निलंबित

0

सोलापूर । शहीद दिन 14 फेब्रुवारीला साजरा करावा असे पत्रक काही दिवसांपुर्वी काढण्यात आले होते. हे परिपत्रक काढणारे शिक्षण अधिकारी तानाजी घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण मंडळ आणि शिक्षण आयुक्तांची अवहेलना करण्याप्रकरणी शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. शहीद दिवस हा 14 फेबु्रवारी रोजी साजरा करावा असे वादग्रस्त परिपत्रक काढण्यात आले होते.

काया होतं परिपत्रक ?

मात्र ही टायपिंगची चूक असल्याचे सांगत हे परिपत्रक पुन्हा रद्द ही करण्यात आले होते.तर दुसरीकडे त्यांचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आंतरजिल्हा बदली प्रकरणीही वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. या बदल्या वादग्रस्त थेट मंत्रालयात गाजत होते. त्यातच 14 फेब्रुवारीचे परिपत्रक काढल्याने शिक्षणमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत परिपत्रक काढणार्‍यावर कारवाईच्या सुचना दिल्या.या सुचना दिल्यानुसार शिक्षण आयुक्त कुमार यांनी शिक्षण अधिकारी यांना निलंबित केले. शहीद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशासाठी 14 फेब्रुवारीला बलिदान दिले होते. त्यामुळे सर्व शाळांमध्ये या क्रातीविरांच्या प्रतिमांचे पूजन करावे, विद्यार्थीच्या आई -वडिलांना आमंत्रित करून शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत देण्याचे त्यांना आवाहन करावे असे परिपत्रक शिक्षणाधिकार्‍यांनी काढले होते. पण भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. मग आपण 14 फेब्रुवारीला शहीद दिन का साजरा करत आहोत? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. यावर काही स्वातंत्र्य सैनिकांना 14 फेब्रुवारीलाही फाशी देण्यात आली आल्याचे सांगितले जात होते. पण नंतर चूक लक्षात आल्यावर टायपिंगची चूक असल्याचे सांगत हे परिपरित्रक रद्द करण्यात आले.दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून घाडगे गायब आहेत.