पुणे-जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात मेजर शशीधरन व्ही. नायर हे शहीद झाले. काल शनिवारी संध्याकाळी शहीद मेजर शशीधरन व्ही. नायर यांचे पार्थिव पुण्यातील दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल येथे आणण्यात आले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. पुण्यातील वैकुंठधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी शशीधरन यांच्या पत्नी तृप्ती, आई लता आणि बहीण सीना तसेच लष्कराच्या अनेक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नायर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना मानवंदना दिली. यावेळी ‘अमर रहे, अमर रहे शशीधरन’ अशा घोषणा देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यातील खडकवासला येथे ते परिवारासह वास्तव्याचे होते. ते मुळचे केरळचे होते. पेट्रोलिंग सुरु असतांना दहशतवाद्यांनी केलेल्या आयइडीच्या स्फोटात ते शहीद झाले.