नंदुरबार। येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश ढोले, उपाध्यक्ष म्हणून महादु हिरणवाळे तर सचिव आनंदा गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षाप्रमाणे यंदाही शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकात गणेशोत्सवानिमित्त श्री ची स्थापना करण्यात मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. विशेष म्हणजे शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे ढोल-ताशे आणि गुलाल न उधळता साध्या पद्धतीने टाळ – मृदृंग वाजता गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. विविध चित्र प्रदर्शनातून मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक, राष्ट्रीय एकात्मत या सारख्या प्रबोधनाला प्राधान्य देण्यात येते.
विविध समाजप्रबोधनपर चर्चा
बैठकीत गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनपर चर्चा झाली. मंडळाचे यंदा 34 वे वर्ष आहे. 1983 पासून मंडळातर्फे क्रांतीकारी आरास, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी जनजागरण, बेटी बचाव, पाणी वाचवा, वृक्ष संवर्धन, राष्ट्रभिमान, देशभक्तीपर उपक्रम अथर्वाशिर्ष, गणेशस्त्रोत्र पठण, शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, सण उत्सवांचे प्रबोधन आदी प्रयोगांची यंदाही परंपरा कायम आहे.
मंडळाची कार्यकारिणी याप्रमाणे
कार्यकारीणी अशी डॉ. गणेश ढोले अध्यक्ष, महादु हिरणवाळे उपाध्यक्ष, आनंदा गवळी सचिव, कैलास ढोले कार्याध्यक्ष, सदस्य – सदाशिव गवळी, संभाजी हिरणवाळे, संजय चौधरी, प्रा. एकनाथ हिणवाळे, नरेंद्र गवळी, नितीन कुंकारी, गोपाल हिरणवाळे, विनायक यादबोसे, दिपक कुशवाह, विशाल आदी तर सल्लागार म्हणून नितीनभाई मेहता सुरत, भरत नुक्ते मुंबई, प्रविण खेडकर शिरपूर, जी.एस. गवळी, विठ्ठल हिरणवाळे, प्रकाश घुसरे यांचा समावेश आहे. गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सव आणि सामाजिक प्रबोधनाची परंपरा शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाने नंदुरबारात टिकवून ठेवली आहे.