पिंपरी-चिंचवड । शहरात दरवर्षी साजरा होणारा गणशोत्सव शांततेत व आनंदी वातावरणात पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची 10 रोजी सायंकाळी पाच वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पिंपरीतील संत तुकारामनगरातील आचार्य अत्रे रंगमंदिरात पालकमंत्री गिरीष बापट यांच्या विशेष उपस्थितीत तर महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. बैठकीला मान्यवरांसह पोलीस अधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे. तरी, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीला हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.