शांततेत मतदान पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

0

अनुचित प्रकारावर राहणार करडी नजर
जळगाव । जळगाव महानगरपालिकेसाठी उद्या बुधवार 1 ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. निवडणुक रिंगणात उभे असलेले इच्छुक उमेदवार यांनी आपापल्या परीने जोरदार प्रचारही करण्यात आल्या. जळगाव शहरात मतदारांनी कोणाच्या दबावाखाली न राहता निर्भयपणे पार पाडावी यासाठी रविवारी पोलीस प्रशासनातर्फे शहरातील संवेदनशील भागात पतसंचलनही करण्यात आले होते. 30 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेनंतर निवडणुकीच्या प्रचार थांबविण्यात आले होते. प्रचार संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांने कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचविण्याचा प्रयत्न करणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

इतर जिल्ह्यातील पोलीसांची राहणार उपस्थिती
शहरात एकुण पाच पोलीस स्टेशनातील पोलीस निरीक्षकांना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सुचना देण्यात आले असून कुठल्याही पक्षाचा उमेदवार अथवा कार्यकर्ता अनुचित प्रकार करतांना आढळून आल्यास त्यांच्या कडक करवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत 146 केंद्र संवेदनशिल असल्यामुळे अशा संवेदनशिल भागाकडे अधिक लक्ष देण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून पोलीस कर्मचारी व प्लाटून मागविण्यात आले आहे. यात अहमदनगर येथील 75,नाशिक ग्रामीणचे 100, नंदुरबारचे 50, धुळे येथील 75 व एसआरपी प्लाटूनमधील 90 कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे.

या भागात राहणार पोलीसांची करडी नजर
कोर्ट चौक, भिलपुरा, असोदा रेल्वे गेट, रथ चौक, नेरी नाका, अजिंठा चौक, काशिनाथ चौक, संतोषी माता चौक, मेहरुण, तांबापुरा, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, मानराज पार्क, पिंप्राळा, पिंप्राळा हुडको, गुजराल पेट्रोल पंप, हायवे दर्शन कॉलनी, सुरत रेल्वे गेट, गेंदालाल मील, शिवाजी नगर हे भाग संवेदनशिल असून या भागात पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांवर बारकाईने लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी दैनिक जनशक्तिशी बोलतांना सांगितले.