पुणे । सर्वांना शांती हवी असेल तर त्यासाठी न्यायाची अधिक आवश्यकता आहे. आपण असे म्हणू शकतो की शांती ही खरी व खोटीसुद्धा असू शकते. कारण ज्या ठिकाणी जे लोक हवे, ते नसल्यामुळे या देशात अशांतीचे वातावरण पसरलेले आहे, असे मत समाजसुधारक मौलाना सय्यद कल्बी रशीद रिझवी यांनी बुधवारी व्यक्त केले.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) पुणेतर्फे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती या विषयावर आयोजित दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदेच्या समारोप्रसंगी ते बोलत होते. प्रा. राहुल कराड, शिराज कुरेशी, वाय. सुदर्शन राव, डॉ. जेनिफर रिटर, देवांशू दत्ता, डॉ.भूमिका गुप्ता, डॉ.एस.आर.भट्ट, रंजना खन्ना, प्रा. डी.पी आपटे आदी उपस्थित होते.
रशीद रिझवी म्हणाले, भारत ही आमची माता आहे. या देशात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी आम्हाला बलिदान देण्याची वेळ आली, तरी ती आनंदाने स्वीकारू. शिराज कुरेशी म्हणाले, हिंदुस्तान, इन्सान आणि इन्सानियत या गोष्टींच्या विषयी सम्मानाबरोबर ते जीवनात प्रत्यक्ष उतरविल्यावर खर्या शांतीचा अनुभव येऊ शकतो. जोपर्यंत मनुष्याला शिक्षणाची आवड आहे, तोपर्यंत त्यात अध्यात्म जीवंत असतेे.
श्रेयांश खंडेलवाल, अंकित बन्सल, अक्षय ठाकूर आणि अंकित पाटील या विद्यार्थ्यांना एमआयटी डब्ल्यूपीयूमधील शांतीदलाचे सैनिक म्हणून घोषित करण्यात आले.प्रा.राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी.पी आपटे यांनी आभर व्यक्त केले.