शाडुमाती गणेशमुर्तीचे मोफत प्रशिक्षण

0
निगडी :  येथील साईनाथ नगरमधील अण्णाभाऊ साठे सभागृहात शाडूमाती गणेशमुर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण सोमवारी, दि. 3 रोजी 11 ते 4 यावेळेत पार पडले. शहराच्या पर्यावरणाला हातभार लावायच्या उद्देशाने विविध वयोगटातील नागरीकांना शाडुमातीपासुन गणपती मुर्ती बनवण्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे अनेक नागरीकांनी कौतुक केले. पोलीस नागरीक मित्र, इसीए, अ.भा.कायस्थ सभा, एकता मित्र मंडळ, जिजाऊ, दुर्गामाता, सिद्धी विनायक, संस्कृती या महिला बचतगटांनी, विश्‍व हिंदु परीषद, द लास्ट ट्री या सामाजीक संस्थांनी या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. त्या कार्यक्रमाला पुणे रेल्वे स्टेशन मास्तर सुनील कामठाण, वाय.सी.एम.हॉस्पीटलचे अभयचंद्र दादेवार, श्रध्दा हॉस्पीटलच्या प्रणीला उर्नरकर यांची उपस्थिती होती. त्यात राहुल श्रीवास्तव, किरण पाचपांडे, मुकेश सिग, स्मिता डेरे, विनीता आंबेरकर, कुसुम जवळकर, प्रियंका गोलार, उमेश दरेकर, राहुल येवले, रजनी बोंडे, अनामिका नारखेडे, उज्वला चौधरी, माधुरी भागवत, नंदकीशोर कुलकर्णी, आलोक त्रिपाठी व डॉ. पाचपांडे ह्यांनी मदत केली. त्र्यंबके व निलेश कोलते यांनी मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.