शानभाग विद्यालयात दहीहंडी व गोपाळकाला कार्यक्रम उत्साहात साजरा

0

जळगाव:- विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.ब.गो. शानभाग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सावखेडा येथे दहीहंडी व गोपाळकाला हा कार्यक्रम उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन दिदि व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे सर यांची उपस्थिती होती. त्यांच्या सोबत निवासी विभाग प्रमुख शशिकांत पाटील , विभाग प्रमुख राजेंद्र पाटील , जगदीश चौधरी  यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांचे शुभहस्ते श्रीकृष्ण प्रतिमा पूजन करण्यात आले. या निमित्ताने सकाळ सत्रात दांडिया स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत एकूण ७५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कविता कुरकुरे व तेजश्री पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेतील विजयी स्पर्धक प्रथम – रिया पाटील, द्वितीय- ऋतिका पाटील, तृतीय – दक्षा बेदमुथा आणि उत्तेजनार्थ- समीक्षा कोठावदे, मयूर जाधव विजेत्यांना मान्यवरांचे शुभहस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता चव्हाण सूत्रसंचालन संतोष जोशी तर दुपार विभागात सुजाता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांनी केले. यावर्षी शासन निर्णयाचा आदर करून १४ वर्षातील विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे बनवून दहीहंडी फोडण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून काठीने दहीहंडी फोडणे असा आगळा वेगळा कार्यक्रम विद्यालयाने घेतला यात प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थी याप्रमाणे सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला. याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, निवासी विभाग प्रमुख, विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा दांडिया आणि डोळ्यावर पट्टी बांधून काठीने दहीहंडी फोडणे या प्रकारात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या दहीहंडी फोडून झाल्यावर सर्वांना गोपाळकाला प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमात आभार प्रदर्शनाची जबाबदारी कार्यक्रम प्रमुख हर्षल घोलाणे तर दुपार विभागात हर्षल बडगुजर यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख हर्षल घोलाणे, रुपाली सुर्वे व दुपार विभागात हर्षल बडगुजर, वैशाली फिरके यांच्यासोबत शालेय परिवारातील सर्व सदस्य यांनी सहकार्य केले