शाब्बास रे विराट … कमाल केलीस तू !

0

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात, जगातील अनेक दिग्गज खेळाडूंना जे जमले नाही, ते करून दाखविले आहे. त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. एकाच वेळी कसोटी, एकदिवसीय, टी-20 क्रिकेटमध्ये 50हून अधिक सरासरी असणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

विराट कोहलीने शनिवारी श्रीलंकेविरूद्ध नाबाद 103 धावांची खेळी केली. या नाबाद खेळीमुळे विराटची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 49.41 वरून 50.03वर गेली. विराटने आजवर 58 सामने खेळले आहेत, त्यात त्याने 4603 धावा केल्या आहेत. 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 8257 धावा केल्या असून त्याची सरासरी 54.68 आहे. तर 49 टी-20 समान्यात 1290 धावा केल्या असून त्याची सरासरी 53 इतकी आहे.
   कसोटी        वन-डे          टी-20
सामने        58          189             49
धावा        4603        8257          1290
सरासरी     50.03      54.68          53