स्थायी सभापतींनी मागविली माहिती;शैव गुरव समाजासाठी दिली होती जागा
जळगाव– तत्कालीन जळगाव नपाने सामाजिक उपक्रमांसाठी शहरात 397 सामाजिक संस्थांना जागा दिल्या आहेत. या जागांवर वेगवेगळ्या संस्थांचा ताबा असून संस्थांनी अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे मनपा प्रशासनाकडून जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहे.दरम्यान, शामराव नगरात मनपाने शैव गुरव समाजासाठी दिलेल्या जागेवर पंधरा वर्षापासून पाच दुकाने उभारून व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी नगररचना विभागाकडून माहिती मागविली आहे.
शहरातील सामाजिक संघटनांना पालिकेने दिलेल्या जागांपैकी काही विकसीत तर काही अविकसीत आहेत.अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे अविकसीत जागा आणि विकसीत जागा ताब्यात घेण्याच्या प्रशासनाने हालचाली सुरु केली आहे. काही जागावर व्यवसायिक वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी रेडक्रॉस सोसाटीच्या शेजारील जागा व रिंगरोडवरील जागेचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्यांना शामरावनगरातील जागेबाबत माहिती मिळाली.दरम्यान,पंधरा वर्षापासून पाच दुकाने उभारून व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अॅड. हाडा यांनी तातडीने नगररचना विभागाच्या अधिकार्यांना खातरजमा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगररचना विभागाचे अभियंता समिर बोरोले यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून संबंधित दुकानदारांना कागदपत्रांची माहिती मागीतली. परंतु जागा शासनाची असल्याने कोणताही मालकी हक्काचा पुरावा नसल्याचे पडताळणीत समोर आले. तसेच ही जागा नगरपालिकेने काही वर्षांपुर्वी गुरव समाजाला 1989 मध्ये 1714 चौरस मीटर जागा अटी व शर्तीनी कराराने दिली होती. याजागेचा समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापर करणे अपेक्षित होते. परंतु गेल्या अनेक वर्षात गुरव समाजाने या जागेचा कोणताही वापर केलेला नसून अटी व शर्तींचा भंग केल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या जागेचा ताबा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.