शारदा क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0

प्रथम आलेल्या श्रद्धाला रोख रक्कमेचे बक्षिस

भोसरीः भोसरीतील ढोकले व ढमे सर संचलित शारदा क्लासेसमधील मार्च 2018 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शालोपयोगी वस्तू, एक उपयुक्त पुस्तक आणि ट्रॅफी देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच वर्गातील इतर विद्यार्थ्यांना देखील बक्षिसाचे वाटप करण्यात आले.

यावेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक नाना लोंढे, पत्रकार अनिल कातळे, नगरसेविका अनुराधा गोफणे, विनया तापकीर, प्रियंका बारसे, नगरसेवक सागर गवळी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कवी राजेंद्र वाघ, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, पद्मश्री नारायण सुर्वे, साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डचे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत गदिया, सुपर कम्प्युटर इन्स्टिट्यूचे संचालक प्रा. शंकर देवरे, करंदीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक ढोकळे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. विलास वाळके, पांडुरंग गवळी, भालचंद्र आवटे, संपतराव साबळे, वाल्मिक दरेकर, बबनराव म्हस्के, गोरक्ष ढोकळे उपस्थित होते.

सवलतीच्या दरात शिक्षण
विलास लांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या राजमाता महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शिक्षण उपलब्ध करुन दिले जाईल. प्रियंका बारसे म्हणाल्या की, अकरावीचे वर्ग हे विश्रांतीचे नसून अधिक मेहनतीचे आहेत. शारदा क्लासेसमधून अनेक विद्यार्थ्यांना शिस्त लागल्याचे नगरसेवक सागर गवळी म्हणाले. अनिल कातळे यांनी छोट्या बोधकथा सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. मुरलीधर साठे, पुरुषोत्तम सदाफुले यांनी देखील मार्गदर्शन केले. क्लासची प्रथम आलेली विद्यार्थिनी श्रद्धा धायबर हिच्यासह पालक स्नेहा रौंधळ, अश्‍विनी जाधव यांना रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब ढमे यांनी केले तर, प्रा. दिगंबर ढोकले यांनी आभार मानले.