शारदा विद्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन

0

अमळनेर । कळमसरे येथील शारदा विद्यालयातील दोन शिक्षकांची बदली करण्यात आली. ही बदली रद्द करून दोन्ही शिक्षकांना याच शाळेत ठेवावे यासाठी मंगळवारी शाळा सुरु होण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांनी व पालकांनी चक्क प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत कामकाज बंद पाडले. ‘आमचे शिक्षक आम्हाला परत द्या‘ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी कामकाज बंद केले बदली रद्द होत नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवू असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

विद्यार्थ्यांचा सहभाग
शारदा विद्यालयात 1300 विद्यार्थी व 30 शिक्षक आहेत. एस.एफ.पावरा व के. जे. सोनवणे याची किनवट (ता. जळगाव) येथे बदली संचमान्यतेचा आढावा घेत करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. हे दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांचे लाडके असल्याने बदली करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली.

समजूत काढण्याचा प्रयत्न
शाळा बंद पाडून आवारात 350 विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले प्रशासनाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांनी पोषण आहारवर बहिष्कार टाकला शेवटी प्रशासनाने संस्थेची सभा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यानीं आंदोलन मागे घेतले.