शारापोव्हा, गार्बाईन मुरूगुजाचे आव्हान संपले

0

न्यूयॉर्क । डोपिंगमुळे 15 महिन्यांच्या बंदीची सजा भोगून पुन्हा टेनिस कोर्टवर परतलेल्या मारिया शारापोव्हाचे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. अन्य लढतींमध्ये व्हीनस विल्यम्स आणि पेत्रा क्वितोव्हाने आगेकूच कायम राखली.लॉटिव्हीयाच्या 16 व्या मानांकित अनास्तासिया सेवास्तोव्हाने पाच ग्रॅण्टस्लॅम जिंकणार्‍या शारापोव्हाचा 5-7, 6-4, 6-2 असा पराभव केला. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीय अनास्तासियाचा सामना अमेरिकेच्या स्लोएने स्टींफसशी होईल. स्लोएनने जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेसला 6-3, 3-6, 6-1 असे हरवत विजयी घौडदौड कायम राखली होती.

महिला एकेरीतील दुसर्‍या उपांत्यपूर्व फेरीत झेक गणराज्यची 13 वे मानाकंन मिळालेली पेत्रा क्वितोव्हा अमेरिकेच्या नवव्या मानांकित व्हीनस विल्यम्सविरुद्ध खेळेल. क्वितोव्हाने तिसरे मानांकन मिळालेल्या आणि दोन ग्रॅण्डस्लॅम जिंकणार्‍या गाबाईन मुगुरूजाचा 7-6, 6-3 असा सरळ पराभव केला. व्हीनस विल्यम्सने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारोला 6-3, 3-6, 6-1 असा परतीचा रस्ता दाखवला. पुरूषांच्या एकेरीच्या लढतीत पाब्लो कारेनोचा अर्जेटिनाच्या दिएगो श्‍वार्त्झमॅनशी होईल.