शार्दूल जाधवर यांना अजित युवा पुरस्कार

0

पुणे । विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवकांचा अजित प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार जाधवर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष शार्दुल जाधवर यांना प्रदान करण्यात येणार आहे. 22 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी बी. व्ही. जी. ग्रुपचे प्रमुख हणमंत गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 11 हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.