शार्दूल ठाकूर, सचिन तेंडुलकर आणि जर्सी नंबर 10

0

नवी दिल्ली । भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली. इतकेच नाही हार्दिक पंड्या संघात असतानाही शार्दूलच्या गोलंदाजांनी डावाची सुरुवात करण्यात आली. उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणार्‍या या मुंबईकर गोलंदाजाचा हा पहिलाचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. या सामन्यात शार्दूल 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरला होता. हा त्याच क्रमाकांचा जर्सी आहे जो कधी काळी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर घालून खेळायचा. स चिनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारल्यावर या क्रमाकांची जर्सी इतर कुठल्याही नवीन भारतीय खेळाडूला देण्यात आली नव्हती. ही जर्सी शार्दूलसाठी खूपच लकी ठरली. आपल्या गोलंदाजीतल्या 10 व्या चेंडूंवरच शार्दूलने श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज निराशेन डिक्वेलाला यष्टीपाठी झेलबाद केले. सुरुवातीला अंपायरने डिक्वेलाला बाद दिले नाही. त्यामुळे डीआरएसचा निर्णय घेण्यात आला. डीआरएसच्या निर्णयात डिक्वेला बाद ठरला आणि शार्दूलच्या खात्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पहिली विकेट जमा झाली.

10 नंबरच्या जर्सीचे रहस्य
एकेकाळी सचिनच्या नावाने प्रसिद्ध असणार्‍या या 10 नंबरच्या जर्सीचे रहस्य काहीसे वेगळे आहे. शार्दूल ठाकूरचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 यादिवशी झाला आहे. संख्याशास्त्राप्रमाणे त्याच्या जन्मतारिखेची एकुण बेरीज 16+10+1991 = 10 अशी येते. त्यामुळे शार्दूलने या 10 नंबरची निवड केली. या जर्सीप्रमाणे सचिन आणि शार्दूलमध्ये आणखी एक साम्य आहे. पक्के मुंबईकर असलेल्या सचिन तेंडुलकर आणि शार्दूल ठाकूर या दोघांची इंग्रजी आद्याक्षरे एसटी अशी आहेत.