शालांत परीक्षेत जयेश जैनचा गुणवत्ता यादीत 14 वा क्रमांक

0

चोपडा। शहरातील प्रताप विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी जयेश प्रमोदकुमार जैन याने इयत्ता-10 वीच्या परीक्षेत 93 टक्के मार्क मिळवून गुणवत्ता यादीत 14 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

चोपडा शहरातील प्रसिद्ध व्यापारी व पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद सुकलाल जैन यांचा जयेश पुतण्या आहे. त्याच्या यशबद्दल माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, कृउबा समितीचे सभापती जगन्नाथ पाटील, माजी सभापती गिरीष पाटील, जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील, नगरसेवक जिवन चौधरी, पं.स.चे माजी सदस्य नंदलाल चौधरी,चोसाकाचे माजी संचालक डॉ.सुभाष देसाई, जैन श्री संघाचे अध्यक्ष गुलाबाचंद देशलहरा, पीपल्स बँके चे संचालक नेमीचंद जैन, सुनील जैन, यांचेसह आदी मान्यवरांनी जयेश जैन सत्कार केला.