भुसावळ : शालिमार एक्स्प्रेसमधील प्रवासी झोपला असल्याची संधी साधत चोरट्यांनी मोबाईल लांबवला. शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता जळगाव स्थानक सोडल्यावर घडली.
लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
राजकोट येथील रहिवासी विशाल सुरेशभाई बडगामा हे शालिमार एक्स्प्रेसच्या एस-7 बोगीतील बर्थ क्रमांक 10 वरून राजकोट ते रायपूर असा प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटे 2.20 वाजेच्या सुमारास गाडीने जळगाव स्थानक सोडल्यावर बडगामा यांचा 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवण्यात आला. लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.