शालेयस्तर निशाणेबाजी स्पर्धा

0

जिल्हा रायफल असोसिएशन, जिल्हा क्रीडा कार्यालय, म.न.पा.चा संयुक्त उपक्रम

तीन गटातील विविध प्रकारात झाली स्पर्धा; ३५ स्पर्धक विजेते

जिल्हा रायफल असो.चे सहकार्य, जिल्हा क्रीडाधिकारी यांचे परिश्रम, म.न.पा.चा उत्स्फुर्त सहभाग

जळगाव । येेथील जळगाव जिल्हा रायफल असो.च्या सहकार्याने जिल्हा क्रीडा कार्यालय व म.न.पा. जळगावच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शालेय निशाणेबाजी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. उद्घाटन प्रविण पटील, तर अध्यक्षस्थानी वकार सिध्दीकी होते. प्रमुख पाहुणे मनपा क्रीडा समन्वयक एम.एम.पाटील, जिल्हा रायफल असो. चे सचिव दिलीप गवळी, देवानंद पाटील, सुनिल पाटील, मसुद अहमद उपस्थित होते. सुत्रसंचालन किरण पाटील तर आभार दिक्षांत जाधव यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून निलेश जगताप, दीपक कोळी, आशिष तिवारी, सागर सोनवणे, सौरभ गवळी, हेमंत मांडोळे, प्रशांत फुलपगारे यांनी काम पाहीले. सुनिल पालवे व प्रा.यशवंत सैदाणे यांचेसह खेळाडूंनी परिश्रम घेतले.

पीप साईट एअर रायफल (मुले) : (१७ वर्षाआतील) क्रिष्णा भाटीया सेंट जोसेफ कॉ.स्कूल, वरुण सपकाळे आर.आर.विद्यालय, (१९ वर्षाआतील) वरद वैद्य रुस्तमजी स्कूल, किरण शिरसाठ मू.जे.विद्यालय, चेतन पाटील, दर्शन पाटील, भुषण बिरारी, प्रताप महाविद्यालय, (मुली) तेजस्वीनी भामरे प्रताप विद्यालय, रुपाली पाटील प्रताप महाविद्यालय, (एअर पिस्टल) देवयानी सपकाळे नंदीनीबाई विद्यालय

ओपन साईट एअर रायफल (मुले) : (१४ वर्षाआतील) प्रणव चंदनकर सेंट टेरेसा स्कूल, रुहम जयराम पाटील प्रोग्रेसिव्ह स्कूल, चिरायु प्रदीप चांगरे न्यु. इंग्लिश स्कूल, (१७ वर्षाआतील) भावेश सुभाष सोने सेंट लॉरेन्स हायस्कूल, गौरव तायडे नुतन मराठा विद्यालय, सुमित नाथ सेंट लॉरेन्स हायस्कूल, (१९ वर्षाआतील) शुभम अशेाक गवळी मू.जे.महाविद्यालय, पिंजारी मो. ईस्माईल इकरा महाविद्यालय, रोहीत अनिल गवळी नुतन मराठा महाविद्यालय.

ओपन साईट एअर रायफल (मुली) : (१४ वर्षाआतील) मांडवी साकलिकर ओरियन इंग्लिश मि.स्कूल, मग्या चंदनानी लॉड गणेशा स्कूल, वैष्णवी सरताले लॉर्ड गणेशा स्कूल, (१७ वर्षाआतील) गायत्री उमाजी गवळी भगिरनथ स्कूल, सोनाली पवार श्रीराम माध्य. विद्यालय, हेमाली भरत पाटील श्रीराम माध्य. विद्यालय , (१९ वर्षाआतील) शेली किशोर खिवसरा प्रताप विद्यालय, वैष्णवी शिरसाठ प्रताप विद्यालय, मानसी पाटील प्रताप विद्यालय

ओपन साईट एअर रायफल (मुले): (१४ वर्षाआतील) रिषी जैन लॉर्ड गणेशा स्कूल, उज्वल अग्रवाल लॉर्ड गणेशा स्कूल, प्रथमेश रायसिंग विवेकानंद स्कूल, रुपेश ठाकरे प्रताप महाविद्यालय, केतन धनगर विवेकानंद शानबाग स्कूल, साहिल मुळे लॉर्ड गणेशा स्कूल, (१९ वर्षाआतील) सुजित पाटील न्यु. इंग्लिश स्कूल