विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न
येरवडा । भीमलहूजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावशेरी मतदार संघातील माध्यमिक शाळांमधील ग्रंथालयांना विविध प्रकारची पुस्तके भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम आयोजित केल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. यामध्ये विविध मराठी साहित्यिकाचे प्रसिद्ध ग्रंथ, ऐतिहासिक महापुरुषांचे आत्मचरित्र आदी पुस्तकांचा समावेश होता.
सदर उपक्रमाचे संयोजन महाराष्ट्र विद्यार्थी अधिकार संरक्षण संघटनाच्या वतीने राज्य प्रतिनिधी प्रताप मोहीते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयतील प्राचार्य गायकवाड यांनी या अभिनव उपक्रमची प्रशंसा केली. ते म्हणाले विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आवंतर वाचनाची अत्यंत गरज आहे. पुस्तकातून समाज घडतो. या कार्यक्रमास भीमलहूजी महासंग्राम संघटनेचे पदाधिकारी सोमनाथ पंचरास, रवि खैरनार, बंटी सोनवणे, सोमनाथ बरडे, शुभम मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.