चिंचवड येथे मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न
पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पिंपरी-चिंचवड महापालिका, श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय आणि ज्युनियर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थीवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिंचवड येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय ज्ञानवर्धिनी सभेचे अध्यक्ष एस. एस. तिवारी, प्राचार्य आर. आर. मिश्रा, कुसुम तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.
तीन गटात पार पडली स्पर्धा
ही स्पर्धा 14, 17, 19 या तीन वयोगटात संपन्न झाली. विविध गटात राजू पारस, वरद सुर्वे, ओंकार सातार्डेकर, हर्षा कोरडे, मंगेश ताकमोघे, समर्थ शिंदे, यश चिनवले, आशुतोष तळेकर, स्वराज मोरे, प्रणव कांबळे, शुभम गुप्ता, शिवम गुप्ता, साक्षी टाटिया, सिद्धी शिर्के, निधी खोब्रागडे, मृणाल सगरे, समृद्धी शेंडकर, तन्वी येवले, अंजली रानवडे, प्रांजल नवले, चंचल सिंह, रजनी राठौड, साक्षी मिश्रा, वंदना त्रिपाठी या विद्यार्थ्यांनी विविध गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व चतृर्थ क्रमांक पटकाविले.
संयोजनात यांचा हातभार
स्पर्धेसाठी राष्ट्रीय सायकलपटू सुनील प्रसाद, शैलेंद्र पोतनीस यांनी पंच म्हणून काम पाहिले. क्रीडा पर्यवेक्षक सुभाष पवार, क्रीडा शिक्षक चांगदेव पिंगळे, पद्मा टकले, राजकुमार माळी, राजेंद्र भोईटे, स्वप्नील चव्हाण यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पांडे यांनी केले.