शालेय जिवनापासून खेळाला महत्व देण्याची गरज

0

जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजन

राष्ट्रीय क्रीडानिमित्त आयाजित कार्यक्रमात डॉ.बलवंत सिंग यांचे प्रतिपादन

नंदुरबार । येथील जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे मंगळवारी यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनचे सचिव डॉ.बलवंत सिंग हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खो-खो असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रा.मनोज परदेशी, टेनिक्वाईट संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक, मिनल वळवी, राजेंद्र पाटील, अनिल रौंदळ, प्रा.मयुर ठाकरे, विजय जगताप, सुनिल निकुंभे, रविंद्र सोनवणे, जितेंद्र पगारे, जगदिश वंजारी, निलेश गावीत, सिंग मॅडम आदी उपस्थित होते.

मुंबईत मैदानाविना खेळ
डॉ.सिंग म्हणाले, की शालेय जीवनात खेळत असतांना विविध अडचणींना खेळाडूंना तोंड द्यावे लागत आहे. आम्ही मुंबईत मैदानाविना खेळत आहोत. परंतू फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागात विविध खेळातील खेळाडू यांच्या अडचणी तसेच खेळाडूंना लागणार्‍या सुविधा या संदर्भातील आवश्यक बाबींसंदर्भात फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे केंद्र शासनाकडे समस्या मांडल्या जातील.

खेळाडूंनी अडचणींवर मात करावी
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळाकडे लक्ष दिले पाहिजे असे मत डॉ. सिंग यांनी मांडले. यावेळी डॉ. सिंग यांनी विद्यार्थ्यांना खेळातांना येणार्‍या अडचणींचा उहापोह केला. तसचे या अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये पुढे येण्याचे आवाहन डॉ. सिंग यांनी केले. खेळाडूंना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. सिंग यांनी यावेळी दिली.

राज्य, राष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती
भारतभरात 265 शहरांमध्ये क्रीडा दिन साजरा होत आहे. नंदुरबारच्या खेळाडूंसोबत क्रीडामय वातावरणात साजरा करण्यासाठी आले असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय खेळाडू उपस्थिती होते. यशस्वीतेसाठी मनिष सनेर, योगेश माळी, भरत चौधरी, रजनी पाटील, जयेश राजपूत, दिनेश कुंभार, किशोर पाटील, अतुल चौधरी, गितांजली पगारे, नरेश राठोड आदींनी कामकाज पाहिले. सुत्रसंचालन प्रा.मयुर ठाकरे तर आभार अनिल रौंदळ यांनी मानले.