भुसावळ। शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या करिअरकडे लक्ष देवून त्यादृष्टीने वाटचाल केल्यास पुढील भविष्य नक्कीच उज्वल राहणार, असे प्रतिपादन कारागृह निरीक्षक जितेंद्र माळी यांनी केले. संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त माळी भवनात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम. पाटील तर मंचावर प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, सचिन चौधरी, माळी महासंघाचे कृष्णा माळी, नंदू पाटील उपस्थित होते.
परिसरातून काढली पालखी मिरवणूक
कार्यक्रमाअगोदर परिसरातून संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी सहभाग घेतला. मंडळाचे सचिव गजेंद्र महाजन यांनी अहवाल वाचन करुन मंडळाच्या कार्याची माहिती दिली. अध्यक्ष कैलास महाजन यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव
याप्रसंगी केवळ कन्यारत्न जन्म देणार्या दाम्पत्यांचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव करण्यात आला तसेच समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणार्या समाजबांधवांचा समाजभूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय महाजन यांनी केले तर आभार कैलास बंड यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास एस.डी. महाजन, रामकृष्णा माळी, सुधाकर महाजन, दशरथ सोनवणे, ईश्वर चौधरी, योगेश महाजन, सुरेश महाजन, मानुरकर, मुकुंदा माळी, राजू माळी, प्रशांत महाजन, डी.एन. महाजन, विजय वानखेडे, डॉ. गोपाळ सोनवणे, चंद्रशेखर वाघमारे, दिलीप माळी, प्रदिप माळी, शैलेश माळी, रमेश महाजन, संजय महाजन, नाना माळी, संदिप माळी आदी समाजबांधवांची उपस्थिती होती. यामध्ये 21 जणांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.