शालेय जीवनापासूनच व्यसनापासून दूर राहावे : राहुल जाधव

0

पुणे : शालेय जीवनापासूनच व्यसनापासून दूर राहायला हवे. तसेच योग्य मित्रांची संगत ठेवावी. आपले आई-वडील आपल्यासाठी जे करतात ते योग्य असते, त्यामुळे त्यांचा राग करू नये. आपले आदर्श ठरवावेत आणि त्यांच्याप्रमाणे आपल्या आयुष्याची दिशा ठरवावी. सिनेमातील गोष्टींच्या आहारी जाऊन त्याचे अनुकरण करू नये, असे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे राहुल जाधव यांनी सांगितले.

कोथरूडमधील नूतन बाल शिक्षण संघातर्फे आंतराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनानिमित्त आयोजित व्यसनमुक्ती जागृती अभियानांतर्गत जाधव यांची मुलाखत सोनाली काळे यांनी घेतली. काळे म्हणाल्या, शालेय जीवनात वाईट संगतीमुळे किंवा परिणामांची जाण नसल्याने मुले व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनाचे भावी आयुष्यात होणारे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांना कळावेत, यासाठी या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.