शालेय पोषण आहारातून तुरडाळ झाली गायब

0

जळगाव । नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सुरु होऊन दोन आठवडे होत आले आहे. मात्र अद्यापही शालेय पोषण आहार पुरवठादारासंबंधीचीचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. मागील वर्षी पोषण आहार पुरवठा करणार्‍या ठेकेदाराचा मक्ता शाळा सुरु होण्याअगोरच संपुष्टात आलेला होता. शाळा सुरु होण्याअगोदर नवीन ठेकेदाराला पोषण आहार पुरवठा संबंधी मक्ता देणे गरजेचे असतांना ठेकेदराच्या नेमणुकीस उशीर झाला. दरम्यान शाळा सुरु झाल्याने पोषण आहार पुरविण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने, जुन्याच ठेकेदारांकडून आहार सामग्रीची मागणी करण्यात आली. शिक्षण संचालकांच्या सुचनेनुसार शिक्षण विभागाने जुन्याच ठेकेदाराला पुरवठ्याचे आदेश दिले आहे. तुरडाळ 155 रुपये किलो प्रमाणे मिळत असल्याने पोषण आहार सामग्रीत तुरडाळीचा समावेश नसणार आहे.

जुलै अखेर पर्यत
जिल्ह्यात साई मार्केटींग कंपनीद्वारे शालेय पोषण आहार सामग्रीचा पुरवठा करण्यात येत होता. या कंपनीची पोषण आहार पुरवठासंंबंधी मक्तेदारी संपुष्टात आली होती. नवीन निवदा प्रक्रिया राबवुन नवीन मक्तेदारांची नेमणुक होण्यापर्यत शालेय शिक्षण विभागाने जुलै अखेरपर्यत त्यांनाच पोषण आहार वाटपाचे आदेश दिले आहे. मंगळवारी पुन्हा मक्ता मिळविण्यासाठी साई मार्केटींग कंपनीचा मक्तेदार शिक्षण विभागात तळ ठोकून बसले होते.

जुलैनंतर नवीन निविदा
जुन्या मक्तेदाराचा पुरवठा आदेश देण्यासाठी शिक्षण विभाग शाळा सुरू होण्यापूर्वीच कामाला लागला होता. आधी नव्या मक्तेदारांसाठी उशिराने निविदा प्रक्रिया राबवून जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ मिळावी, यासाठी शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव देण्याची तत्परता जळगाव जि. प. शिक्षण विभागाने दाखवली होती. मात्र जुन्या ठेकेदारालाच मुदत वाढ मिळाली असून नवीन निवीदा प्रक्रिया जुलै नंतर राबविण्यात येणार आहे.