शालेय प्रणालीत नावे येऊन देखील वेतन नसल्याने शिक्षक हवालदिल

0

धुळे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतील उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकांना मागील अकरा महिन्यांपासून नाशिक विभागीय उपसंचलकांनी मान्यता दिली आहे. मात्र, या शिक्षकांचा शालेय प्रणालीमध्ये नाव घेण्यात आलेले नसल्याने त्यांना वेतन सुरू झालेले नाही. वेतन नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या कुटूंबावर उपसमारीची वेळ आली असल्याने या शिक्षकांच्या नावाचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली मातृसेवा प्राथमिक संघ शाळेत सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अध्यक्ष भरतसिंग भदोरीया, उपाध्यक्ष नितीन ठाकूर, राजेंद्र सुर्यवंशी, ए. बी. जोशी, महेश मुळे, अशोक गिरी, रविंद्र टाकणे, सुरेश बडगुजर, मनोज शिंदे, गोपाल चौधरी, योगेश सोनवणे, मनोज शेवाळे, हर्षल बागुल, चंद्रकांत कापडे, नितीन पाटील, किरण पाटील, भूषण घुगे, के. एम. पाटील, संजय बोरसे, गजानन धनगर, संतोष भदाणे, उदय कुमार सोनवणे, अजय राठोड, हेमंत बाविस्कर, रोहन पाटील आदी उपस्थित होते.